कोलते पाटील डेव्हलपर्स विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोलते पाटील यांच्या वारजे येथील के.पी. टॉवर्स हा गृहप्रकल्प बंद असताना चार फ्लॅटसाठी पैसे घेतले. पैसे घेऊन करार केला नाही. तसेच ४ फ्लॅटसाठी घेतलेले १ कोटी २१ लाख ३७ हजार ५६२ रुपये परत न करता आर्थीक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी कोलते पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ओनरशिप प्लॅट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रमाशंकर दुबे (वय-४१ रा. काकडे सिटी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ाद दुबे आणि त्यांची मेव्हणी यांनी कोलते पाटील यांच्या वारजे येथील के.पी. टॉवर्स या गृहप्रकल्पात २ बिचकेचे प्रत्येकी दोन असे एकूण चार प्लॅटसाठी मार्च ते ऑगस्ट २०१५ दरम्यान १ कोटी २१ लाख ५६२ रुपये दिले होते. पैसे दिल्यानंतर दुबे यांनी करार करून द्या असे सांगितले. त्यावेळी जूनमध्ये करार करू असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, पैसे देऊनही त्यांनी करार केला नाही. तसेच फ्लॅट दिले नाहीत.

के.पी. टॉवर्सचा प्रकल्प बंद पडला असताना पैसे परत न करता आर्थीक फसवणूक केली असल्याचे दुबे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक