तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह, घातपाताचा संशय

नाशिक :पोलिसनामा ऑनलाईन – तपोवन परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अज्ञात युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आल्याचा प्रकार शनिवार (दि १२) दुपारी उघकीस आला. या मृतदेहाची ओळख पटली नसून शवविच्छेदनात युवतीच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे,. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी केलेल्या आकस्मात मृत्यूची नोंद ऐवजी रविवारी (ता.१३) खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळाची पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यानी पहाणी केली.

शनिवारी कुजलेल्या मृतदेहाचे गुन्हे शोधपथकाच्या उपस्थितीत जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह अंदाजे १७ ते २५ वयाच्या युवतीचा असून, डोक्यावर हत्याराने आघात केल्याचे आढळले आहे. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली. त्यात, सोनोग्राफीचे अहवाल असलेली फाइल मिळाली. त्यावरून संबधित मृत युवती नाशिक रोड परिसरातील असल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनी नाशिक रोडसह परिसरातील सोनोग्राफी सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान, युवतीचा घात-पात झाला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे.याशिवाय इतरही काही महिती हाती आल्याने दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची आशा तपासी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.