रणवीर सिंगच्या बेडवर पत्नी दीपिकासोबत होती ‘ती’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रणवीर सिंगला गली बॉय सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला होता. परंतु त्याची पत्नी दीपिका पादुकोण हीचेही पाय जमीनीवर नव्हते. दीपिकाचाही आनंद पाहण्यासारखा होता.

रणवीर सिंगनं एक फोटो शेअर केला आहे त्यावरून तरी असंच काहीसं चित्र दिसत आहे. रणवीरनं इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दीपिका पादुकोण दिसत आहे. परंतु खास बात अशी की, या फोटोत दीपिका पादुकोण फिल्मफेअरची ट्रॉफी घेऊन झोपलेली दिसत आहे. या फोटोला रणवीरनं दिलेलं कॅप्शनही खूपच मजेदार आहे.

फोटो शेअर करताना रणवीर आपल्या कॅप्शनमध्ये म्हणतो, “जेव्हा माझी लिटल लेडी माझ्या ब्लॅक लेडीला भेटते.”फिल्मफेअर अवॉर्ड 2020 मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या गली बॉय सिनेमानं भन्नाट सादरीकरण केलं. या सिनेमानं, बेस्ट फिल्म, बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस सहित 13 अवॉर्ड्स आपल्या नावावर केल्याचं पहायला मिळालं. हे अवॉर्ड फंक्शन पार पडल्यानंतर जिकडे तिकडे गली बॉयचीच चर्चा होताना दिसून आली. रणवीरनंही ब्लॅक लेडीसोबत एक फोटो इंस्टावरून शेअर केला होता.