सरकारी पेन्शनमध्ये 20 टक्के होऊ शकते कपात ? अर्थ मंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या
नवी दिल्ली : वित्त मंत्रालयाने आज स्पष्ट केले की, कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान रोखीची बचत करण्यासाठी पेन्शनमध्ये 20 टक्क्यांची कपात केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. वित्त मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, अशा प्रकारच्या वृत्तांतात असे सांगितले जात कि, केंद्र सरकारने पेन्शनमध्ये 20 टक्क्यांनी कपात करण्याचा विचार करत आहे. ही बातमी खोटी आहे. पेन्शन वितरणात कोणतीही कपात केली जाणार नाही. हे स्पष्ट केले जात आहे की, पगारावर व पेन्शनवर सरकारी रोख व्यवस्थापन निर्देशांचा परिणाम होणार नाही.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे की, ‘पेन्शन वितरणात 20 टक्के कपात करणारे केंद्र सरकारचे परिपत्रक सोशल मीडिया आणि टीव्ही वाहिन्यांवर व्हायरल होत आहे, त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे खरे आहे का? कृपया त्वरित स्पष्टीकरण द्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर उत्तर दिले की, ‘स्पष्टीकरण मागितल्याबद्दल धन्यवाद. निवृत्तीवेतनात कपात केली गेली नाही.’
It is being reported that a 20% cut in Central Government Pensions is being planned.This news is FALSE. There will be no cut in pension disbursements. It is clarified that salaries and pensions will not be affected by Government Cash Management instructions.@PIBFactCheck https://t.co/hlZpnbxnJx
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 19, 2020
दरम्यान, सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विधवांना तीन महिन्यांची आगाऊ पेन्शन मिळेल. कोरोना व्हायरस लॉकडाऊन लक्षात घेता राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी) दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
किती मिळते पेन्शन?
एनएसएपीच्या मते, 60-79 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 200 रुपये प्रतिमहा पेन्शन आणि 80 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना दरमहा 500 रुपये पेन्शन दिली जाते. त्याचबरोबर 40 ते 70 वर्षांच्या विधवांना दरमहा 300 रुपये पेन्शन मिळते आणि 80 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या विधवांना दरमहा 500 रुपये पेंशन मिळतात.
दिव्यांगसाठी 79 वर्षांपर्यंत दरमहा 300 रुपये पेन्शन मिळते आणि ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना दरमहा 500 रुपये पेन्शन मिळते.