मोठा दिलासा ! ‘या’ 14 बँकांनी दिली 3 EMI भरण्यावर दिली ‘सूट’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेद्वारा ईएमआय न घेतल्याबद्दल बँकांना सूट जाहीर केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यास सुरवात केली आहे. बहुतेक बँकांनी मार्च मधील ईएमआयला जून मध्ये घेण्याचे सांगितले आहे. तथापि, काही बँकांनी ईएमआयचा विकल्प ठेवला आहे. म्हणजेच, जर एखाद्याला ईएमआय भरणे सुरू ठेवायचे असेल तर ते भरू शकतात.

सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या काळात येणाऱ्या सर्व मुदतीच्या कर्जाची ईएमआय 3 महिने पुढे ढकलली. म्हणजेच मार्चचा ईएमआय जूनमध्ये घेतला जाईल. यासह पंजाब आणि सिंध बँकेनेही तीन महिन्यांचा ईएमआय पुढे ढकलला आहे. तसेच आयडीबीआय बँकेने 3 महिन्यांसाठी ईएमआय पुढे ढकलला आहे. दरम्यान या कालावधीत ईएमआय भरू शकणाऱ्या ग्राहकांना ईएमआय सुरू ठेवण्याचा पर्याय बँकेने दिलेला आहे. तसेच कॅनरा बँकेने 3 महिने सवलत देऊन बचत गटाला संपत्ती व मार्जिनशिवाय 20 लाखांपर्यंतचे कर्ज देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

मुदतीच्या कर्जाच्या 3 महिन्यांच्या ईएमआयसह आंध्र बँकेनेही क्रेडिट कार्डच्या थकबाकीत दिलासा दिला आहे. त्याच वेळी इंडियन बँक, यूको बँक, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओबीसी, पंजाब नॅशनल बँक अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॉर्पोरेशन बँक ने देखील 1 मार्च ते 31 मे 2020 च्या दरम्यान ईएमआयला जूनपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like