HDFC बॅंकेला RBI चा दणका, तब्बल 10 लाखांचा ठोठावला दंड, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्लीः  पोलीसनामा ऑनलाईन – खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सब्सिडिअरी जनरल लेजरमध्ये आवश्यक रक्कम न ठेवल्याने एसजीएल बाउन्स झाला. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एचडीएफसी बॅंकेला तब्बल 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेने एक्सचेंज फायलिंग (Stock Exchange Filing) मध्ये याबाबत माहिती दिली आहे. आरबीआयकडून एचडीएफसी बँकेला 9 डिसेंबरला दंड ठोठावल्याचा आदेश देण्यात आला आहे.

RBI ने आदेशात काय म्हटले आहे?
RBI ने नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, SGL बाउन्स झाल्यामुळे HDFC बँकेवर 10 लाख रुपयांचा मॉनिटरी दंड लावला आहे. 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या सीएसजीएल अकाउंटमध्ये (Constituent Subsidiary General Ledger, CSGL Account) काही सिक्योरिटीजमध्ये बॅलन्सची कमतरता होती. आरबीआयच्या या आदेशानंतर HDFC चे शेअर्स शुक्रवारी 1,384.05 रुपयांवर ट्रेड करत होते.

SGL म्हणजे कायः हे एक प्रकारचे डिमॅट खाते असते. ज्यात सरकारी बाँड्स बँकांद्वारे ठेवले जातात. तर सीएसजीएल बँकेमार्फत उघडला जातो ज्यामध्ये बँका ग्राहकांच्या वतीने बाँड ठेवतात. जेव्हा बाँडसंबंधित काही व्यवहार अयशस्वी झाल्यास त्याला एसजीएल बाउन्स झाल्याचे म्हणतात.

दरम्यान गेल्या काही काळापासून डिजिटल कामकाजामध्ये येणाऱ्या समस्येमुळे आयबीआयने एचडीएफसी बँकेला फटकारले होते. गेल्या डिसेंबरमध्ये आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रस्तावित डिजिटल सेवावर बंदी आणली आहे