ट्विटरवर चूकीची माहिती दिल्याने जिग्नेश मेवानीवर FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातचे वडगाममधील आमदार जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. जिग्नेश मेवानी यांच्याविरोधात RMVM स्कूलच्या प्रिंसिपल यांनी FIR दाखल केली आहे. झाले असे की सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक शिक्षिका मुलांना मारहाण करत आहे. या व्हिडियोला जिग्नेश मेवानी यांनी RMVM स्कूल आहे असे सांगत ट्विट केले आहे.

व्हिडिओमधील शाळेची दिली चूकीची माहिती –

२० मे ला जिग्नेश मेवानी यांनी PMO ला हा व्हिडिओ टॅग केला होता. पडताळणी करण्यात आल्यानंतर लक्षात आले की हा व्हिडिओ मिस्र स्कूल मधील आहे, परंतू जिग्नेश मेवानी यांनी हा व्हिडिओ वलसाडमधील RMVM स्कूल असल्याचे सांगितले आहे. यानंतर जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात शाळेच्या प्रिंसिपलने तक्रार दाखल केली आहे.

जिग्नेश मेवानी यांनी ट्विट केले की, हा प्रकार अत्यंत वाईट आहे, आपल्या व्हाटस अॅप वर जेवढे ग्रुप आहे सगळेकडे हा व्हिडिओ शेअर करा, ही वलसाडच्या RMVM स्कूलमधील शिक्षका आहे. याला इतकी शेअर करा की शिक्षिका आणि स्कूल दोन्ही बंद होतील. पीएमओ इंडियाने देखील सांगावे की हा काय प्रकार आहे.

ट्विट वरून झालेल्या वादानंतर जिग्नेश मेवानीने हे ट्विट डिलीट केले आहे. असे असले तरी त्यांनी केलेल्या ट्विटचे लोकांनी स्क्रीन शार्ट घेतले आहेत त्यामुळे हे ट्विट अजूनही व्हायरल होतं आहे.

सिनेजगत

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका 

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1