FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On Congress Workers In Pune | पंजाब येथील सिंधू बॉर्डर येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन आणि एका शेतकऱ्याचा झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातील झाशी राणी पुतळा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा युवक काँग्रेच्या वतीने पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.

शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात (Congress Bhavan) सोमवारी (दि.26) युवक काँग्रेसचा मेळावा आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही कार्यकर्ते कृत्य करणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना (Deccan Police Station) मिळाली होती. त्यानुसार बालगंधर्व चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.(FIR On Congress Workers In Pune)

सायंकाळी सातच्या सुमारास घोले रोड येथून युवक काँग्रेसचे आठ ते दहा कार्यकर्ते झाशी राणी पुतळा चौकात आले.
कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान,
मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची
माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना