FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On Dr Ashish Bharti | कोरोना काळात (Corona In Pune) घडलेल्या वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के रुग्णालयातील अ‍ॅटिजेन कीट तपासणी घोटाळा (Antigen Test Kit Scam In Pune) प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (FIR On Dr Ashish Bharti), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तरडे (Dr Tarde Aruna) , स्टॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गार्डी (Dr. Hrishikesh Gardi) यांच्याविरुद्ध फसवणूक (Cheating Fraud Case) व इतर कलमाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत डॉ. सतीश कोळसुरे (वय ४२, रा. नवी सांगवी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४८१/२३) दिली आहे. हा प्रकार वारजे येथील अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात घडला होता. (FIR On Dr Ashish Bharti)

वारजे येथील महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा प्रकार घडला. त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घोटाळ्यातून तब्बल ७० ते ८० लाख रुपयांची अफरातफर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तक्रारदार डॉ. सतीश कोळसुरे (Dr Satish Kolsure)
यांनी अ‍ॅड. नितीन नागरगोजे (Adv. Nitin Nagargoje) यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश सी. एस. पाटील (JMFC Judge CS Patil)
यांनी वारजे पोलिसांनी १५६ (३) प्रमाणे सखोल तपास करुन अहवाल सादर करावा असा आदेश दिला आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Sr PI Sunil Jaitapurkar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली