Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

पुणे : Pune PMC News | सरकार बदलले की महापालिकेतील Pune Municipal Corporation (PMC) अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे ‘नियम’ही बदलत असल्याचे एका अभियंत्याच्या बदलीमुळे समोर आले आहे. विशेष असे की, काही महिन्यांपुर्वी बांधकाम विभागातील कार्यकाळ पुर्ण झाल्याने घन कचरा विभागात बदली झालेल्या या उपअभियंत्याची पुन्हा बांधकाम विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे घन कचरा विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. यासाठी एका ‘माननीया’ने खास प्रयत्न केले असून त्यांच्या आशिर्वादाने हा अधिकारी महापालिकेत ‘राज्य’ करत असल्याने दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढल्याच्या सुरस कथा कर्मचारी वर्ग ऐकवू लागला आहे. (Pune PMC News)

महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी एकाच खात्यात चार हून अधिक वर्ष ठाण मांडून असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर महापालिकेमध्ये मागील सहा महिन्यात बदल्यांचे सूत्र सुरू झाले. हे करत असताना ज्या अधिकार्‍यांनी पुर्वी ज्या खात्यात काम केले नाही, त्या खात्यात बदलीचा प्रेपरन्स त्याच अधिकार्‍याला विचारून करण्यात आला. यामुळे पालिकेच्या काही खात्यांमधील बहुतांश अधिकारी बदलले गेल्याने त्या खाते प्रमुखांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतू त्यांच्या विनंतीनंतरही वरिष्ठांनी बदल्यांची भूमिका कायमच ठेवली. (Pune PMC News )

एकीकडे वरिष्ठ ही भूमिका घेत असताना काही ‘मलईदार’ खात्यात मात्र खास मान्यवरांच्या विनंतीवरून ‘मर्जीतील’ अधिकार्‍यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. नुकतेच पुन्हा बांधकाम विभागात बदली होउन आलेल्या अभियंत्याने ‘रंग’ दाखवायला सुरूवात केली आहे. विशेष असे, की काही दिवसांपुर्वी त्यांची घन कचरा विभागात बदली झाली होती. परंतू तेथून काही महिन्यातच बांधकाम विभागात बदली करून घन कचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राजकारण्यांमध्ये उठबस असलेला ‘या’ अभियंत्याचे प्रताप त्यांनी यापुर्वी काम केलेल्या खातेप्रमुखांना चांगलेच माहिती आहेत. परंतू सत्तेपुढे शहाणपण आणि नियम चालत नाहीत, याचीच प्रचिती त्यांच्याकडे दोन खात्यांचा पदभार देण्यावरून येत आहे.

या महाशयांनी घन कचरा व्यवस्थापन विभागात ‘डोकं’ लावून कचर्‍याची समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्याच कामांचे नव्याने आणि वाढीव दराने टेंडर काढण्यासाठी फाईलही तयार केली. ती अतिरिक्त आयुक्तांपर्यंत पोहोचली. परंतू महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती फाईल परत पाठविली. यानंतरही ठेकेदारांना अडचणीत आणून नव्याने ‘रिचार्ज’ मारण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या खात्यामध्ये काम करणारे सर्वच ‘डिस्टर्ब’ झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

बांधकाम विभागामध्ये असताना या मान्यवराने त्यांच्या हद्दीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामांना ‘अभय’ दिले आहे.
पुन्हा बदली या विभागात बदली झाल्यानंतर त्याच टेबलचा चार्ज त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यासाठी एका ‘मान्यवरांनी’ सर्वतोपरी ‘स्टेक’ लावले आहेत.
अशा अधिकार्‍यांमुळे जेथे बांधकामांना परवानगी नाही अशा भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे फोफावली आहेत.
तेथे रस्ते, पाणी, अतिक्रमणे अशा अनेक समस्यांचे आगार झाले आहे.
याचा परिणाम येथील दहा ते बारा कि.मी. परिसरातील नागरीकांना होत आहे. याला कारणीभूत जेवढे संबधित माननीय आहेत,
तेवढेच दबाखाली काम करणारे प्रशासन असल्याची चर्चा आता महापालिकेतील कर्मचारीच करू लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुलाच्या मृत्यूनंतर पुणे महापालिकेला आली जाग, बांधकाम थांबवण्याचे दिले आदेश