FIR On NCP Activists | प्रा. नामदेव जाधवांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On NCP Activists | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-15 कार्यकर्त्यांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) गुन्हा (FIR On NCP Activists) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रा. नामदेव निवृत्ती जाधव (वय-45 रा. प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

नामदेव जाधव यांच्या फिर्यादीवरुन विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 ते 15 जणांवर आयपीसी 143, 147, 149, 353, 323, 336, 341, 352, 504, 506, 506/2 नुसार गुन्हा (FIR On NCP Activists) दाखल केला आहे. हा प्रकार नवी पेठेतील पत्रकार भवन येथे शनिवारी (दि.18) घडला.

नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्य़ादीत म्हटले आहे की, भांडारकर इन्स्टिट्युट येथील नियोजीत कार्यक्रम का रद्द करण्यात आला, याबाबत पत्रकार भवन येथे पत्रकारांना माहिती देण्यासाठी गेलो होतो.
त्यावेळी अचानक 10 ते 15 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य़कर्ते जमले.
शरद पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेतली म्हणून तोंडावर व अंगावर काळी शाई लावली.
तसेच यापुढे शरद पवार यांच्या विरुद्ध वक्तव्य केले तर तुम्ही या जगात दिसणार नाही अशी धमकी दिली.
तर त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी अक्षय कांबळे (Police Constable Akshay Kamble)
हे त्यांचे शासकीय कर्तव्य करत असताना त्यांनाही धक्काबुक्की करुन बाजूला ढकलले.
त्यांच्याही तोंडाला काळे फासल्याने त्यांच्या वर्दीवर काळे डाग पडल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बालदिनादिवशी 7 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपी रिक्षाचालकाला अटक