Satara News : अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्याविरोधात FIR

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – माण तालुक्यातील एका राजकीय कार्यकर्त्याचं अपहरण केल्या प्रकरणी सेनेच्या एका नेत्याचं नाव समोर आलं आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात संबंधित नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून गेल्या काही दिवसात सातारा जिल्ह्यातील विविध भागात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातूनच काही ठिकाणी ठराव झालेल्या कार्यकर्त्यांचे अपहरण करण्याचे प्रकार घडले.

आज (सोमवार दि 1 मार्च 2021) धनाजी शिंदे यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दिली असून संबंधित प्रकरणात आता सेनेच्या नेत्याचं नाव समोर आलं आहे. यानंतर आता त्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.