घर बसल्या नोंदविता येणार एफआयआर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

एखादा सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्यात न जाताही गुन्ह्याची तक्रार नोंदवू शकतो अशा प्रकारची पहिली डायल-एफआयआर योजना उत्तर प्रदेश पोलीस लवकरच सुरू करणार आहे. एवढेच नव्हे; तर गुन्हेगारांच्या आॅनलाइन छायाचित्र दस्तावेजांचीही तयारी केली जात आहे, जे 22 हजार नव्या “आय-पॅड’वरून पोलिस कर्मचाऱ्यांना पुरविली जाणार आहे, असे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B07C63FVJQ,B01N7THJKE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0f9d5f6-ba39-11e8-9749-3b194806dd11′]

पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याच्या तक्रारी देशात सर्वत्र आढळून येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ही योजना आणली आहे.

सिंह म्हणाले, की आम्ही लवकरच ई-एफआयआर किंवा डायल-एफआयआर ही योजना राज्यात सुरू करणार आहोत. एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) नोंदविल्याशिवाय तुमच्या तक्रारीच्या तपासाला सुरवात होत नाही. यामध्ये कसा बदल करता येईल याचा आम्ही विचार करत होतो आणि त्यानंतर आम्हाला यूपीमधून शंभर क्रमांकावर दररोज जवळपास २० हजार तक्रारी मिळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता कोणताही गुन्हा घडला आणि एखाद्याने त्याची शंभर क्रमांकावर डायल करून एफआयआर नोंदवू शकतो. ही नियमित एफआयआरप्रमाणेच असेल. लोकांना त्यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदविण्याची गरज नाही. अशा प्रकारची सुविधा देणारे यूपी अग्रेसर राज्य ठरेल.

राज्यातील उद्योग व्यवसाय रसातळाला गेले : धनंजय मुंडे

उत्तर प्रदेश पोलिस दहशतवादविरोधी मोहिमेचीही व्याप्ती वाढविण्यात येणार असून, यासाठी १०० नव्या दमाच्या कमांडोंना विशेष कौशल्यांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचीही पहिली तुकडी असेल. दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) गुणात्मक आणि संख्यात्मक ताकद वाढविण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे.