योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

गाझियाबाद : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशा( Uttar Pradesh)तील गाझियाबाद(Ghaziabad)च्या लोनी बॉर्डर(Loni Border) वर अब्दुल समद यांना झालेली मारहाण आणि दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 9 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये ट्विटरच्या अधिकार्‍याचा सुद्धा समावेश आहे. लोनी बॉर्डर पोलीस डाण्याचे सब इन्स्पेक्टरने एफआयर दाखल केला.

आयपीसी कलम 153, 153ए, 295ए, 505, 120बी तसेच 34 अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. योगी सरकारने FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाझियाबाद(Ghaziabad)मधील एका मुस्लिम ज्येष्ठाच्या मारहाणीचा व्हिडिओ वायरल झाला होता.
या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, मारहाण झालेल्या ज्येष्ठाने चुकीची माहिती दिली होती.
ज्येष्ठाने अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध एफआयआर दाखल केला होता, परंतु ते मारहाण करणार्‍यांना ओळखत होते आणि जबरदस्तीने जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितल्याचा कोणताही प्रकार घडला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी म्हटले, तपासात आढळले की, पीडित अब्दुल समद 5 जूनला बुलंदशहरहून बेहटा (लोनी बॉर्डर) येथे आले होते, येथून अन्य एका व्यक्तीसोबत मुख्य आरोपी परवेश गुज्जरच्या घरी बंथला (लोनी) येथे गेले. परवेशच्या घरी काही वेळात इतर तरूण कल्लू, पोली, आरिफ, आदिल व मुशाहिद इत्यादी आले आणि परवेशसोबत मिळून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
मारहाण करणार्‍यांनी पोलिसांना म्हटले, अब्दुल समद तावीज बनवण्याचे काम करतात.
त्यांनी दिलेल्या तावीजचा त्यांच्या कुटुंबावर उलटा परिणाम झाला.
या कारणामुळे त्यांनी हे कृत्य केले.

अब्दुल समद आणि प्रवेश, आदिल, कल्लू इत्यादी तरूण एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात, कारण अब्दुल समद यांनी गावातील अनेक लोकांना तावीज दिले होते.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी काही कलमांचा समावेश करण्यात आला असून परवेश गुज्जरला अटक करण्यात आली.

या प्रकरणात 14 जूनला इतर दोन आरोपी कल्लू आणि आदिल यांना अटक करण्यात आली आहे.
इतरांना लवकरच अटक केली जाईल.
व्हिडिओ वायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केले होते.
यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून युपीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असे उत्तर देण्यात आले होते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : fir registered on twitter in viral video beating loni elderly man nodelsp

हे देखील वाचा

16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार

Nashik – Pune railway line | पुणे रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांना 5 पट मोबदला, पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन