धुळे : शिरपूरात फर्निचर दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालूक्यातील शिरपूर गावात पाचकंदिल चौकातील रस्त्यावर असलेले राजलिनिंग अँण्ड होमडेकोअर सोफा विक्री कुशन साहित्य विक्री दुकानाला सकाळी सहा वाजता शॉटसर्कीटमुळे आग लागली. दुकानात फोम व रेक्झीनचे साहित्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले.

शिरपूर अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंञण मिळविण्यासाठी पाणी मारा करत आग अटोक्यात आणली. आगीत दुकानातील पाच ते सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आगीत कुठलीहि जिवीत हानी झाली नाही. परिसरात आगीची वार्ता कळताच बघ्यांची गर्दी जमा झाली होती. आगीबाबत शिरपूर पोलीसांत अग्नि उपद्रव ३/६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरा पर्यत सुरु होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like