नवी मुंबई : तुर्भे MIDC तील कलर कंपनीत अग्नीतांडव, 3 कंपन्यांनी घेतला पेट

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   तुर्भे एमआयडीसीमधील बालाजी कलर कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच आग बाजूला असलेल्या 3 कंपन्यामध्ये पसरल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. रविवारी (दि. 2) सकाळी ही आग लागली. सुदैवाने अग्नीतांडवात कोणतीही जीवतहानी झालेली नाही. तसेच कोणी जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आगीतून दोन कामगारांची सुटका केल्याचे समजते. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने आज रविवार आणि त्यातल्या त्यात लॉकडाऊन असल्यामुळे जास्त कामगार कंपनीत उपस्थित नव्हते.