टिटवाळ्याच्या जंगलात वन कर्मचाऱ्यावर गोळीबार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

येथील खडवली आणि टिटवाळ्यामधील दानबावच्या जंगलात पाहणी करत असलेल्या वन कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छऱ्याच्या बंदुकीतून हा गोळीबार केला असून ,छऱ्यांच्या आघाताने वन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

वन कर्मचारी पंकज गडरी हे या गोळीबारात जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून ,आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , वन कर्मचारी दैनंदिन पाहणी करण्यासाठी जंगलात गेले असताना खांद्यावर पिशवी असलेले संशयास्पद दोन व्यक्ती फिरत असतानादिसल्या. वन कर्मचाऱ्यानी त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्या दोन व्यक्‍तींनी आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. गोळीबार करून दोघेजण तिथून पसार झाले. यानंतर पंकज यांना तात्‍काळ ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी, मुरबाड राजेंद्र मोरे, टिटवाळा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलिस निरीक्षक जितेंद्र अहिरराव या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली असून, याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.