मुंबई : वृत्तसंस्था
दादर फुल मार्केटमध्ये गोळीबार एकाची गोळी घालून हत्या झाल्याची घटना समजत आहे. मनोज मौर्य या व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. हल्ला करणारे हल्लेखोर हे अज्ञात असल्याचे समोर येत आहे. ल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. मनोज मौर्य यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. दादर फुल मार्केट गजबजलेला परिसर असून अशा ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ebe03c8-cdf2-11e8-bb24-d7e2473806b1′]
समोर आलेल्या माहितीनुसार सदर घटना ही सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात मनोज मौर्य यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज मौर्य फुल मार्केटमध्ये वजनकाटा पुरवण्याचं काम करत होते. गोळीबाराचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी गोळीबार झालेला परिसर सील केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दादरसारख्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पहा व्हिडीयो : दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून मनोज मौर्या या इसमाची हत्या
एका मिसकाॅलच्या मदतीने पीएफ ची रक्कम जाणून घ्या
मुंबई : आता आपल्या पीएफ अकाऊंटबद्दल कधीही माहिती घेणं अगदी सहज होणार आहे. आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे, नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती मिळवणं आता सहज शक्य आहे. तुमच्या प्राॅव्हिडंट फंडातील शिल्लक रकमेची माहिती तुम्ही आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून जाणून घेऊ शकणार आहात. मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला 011-2290 1406 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.
मोबाईल नंबर तुमच्या पीएफ अकाऊंटला कसा लिंक कराल?
- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा उजव्या बाजूला खालील बाजूस Activate UAN वर क्लिक करा.
- तिथे UAN नंबर टाका. हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल.
- यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा.
- त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येईल.
- मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता.
- तसंच 011- 2290 1406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.