माझा देश माझी जबाबदारी ही भावना रुजणे गरजेचे : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देशासाठी आणि समाजासाठी आपण काय करतो, हे महत्त्वाचे आहे. देशात सामाजिक काम करणा-या संस्था व माणसे अनेक आहेत. मात्र, ती टिकणे आवश्यक आहे. देवाचे दुसरे नाव म्हणजे प्रयत्न आणि कार्य. त्यामुळे आपल्या कार्यातून देवाची पूजा करायला हवी. भारत माझा देश आहे, हे जसे आपण म्हणतो. त्याप्रमाणे माझ्या देशाप्रती अनेक जबाबदा-या आहेत, ही भावना देखील रुजणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

महा एनजीओ फेडरेशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील एक हजार सामाजिक संस्थांच्या कार्य परिचयाचे नाते समाजाशी या पुस्तकाचे प्रकाशन औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीचे खासदार महेश गिरी, बी.व्ही.जी.चे चेअरमन हणमंत गायकवाड, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रल्हाद राठी, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी,  फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सहसंस्थापक विजय वरुडकर आदी उपस्थित होते.
गिरीष बापट म्हणाले, सामाजिक काम करण्याची आवड प्रत्येकामध्ये असते. त्यामुळे समाजात काम करणा-या अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून लहान सामाजिक संस्थांना एकत्र करुन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम कौतुकास्पद आहे.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8b62619-a158-11e8-ae96-b180be0a5256′]