Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Corona side effects | दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलम (Sir Gangaram Hospital Mumbai) ध्ये दाखल कोविड-19 (Covid-19) रूग्णांमध्ये सायटोमेगालो व्हायरस (CMV) मुळे शौचावाटे ब्लिडिंगची पाच प्रकरणे समोर आली आहेत. कोविड-19 इम्युनोकोम्पेटंट  (Immunocompetent ) रूग्णांमध्ये सायटोमेगालो व्हायरस (Cytomegalovirus) मुळे होणार्‍या रेक्टल ब्लिडिंगच्या पाच प्रकरणांचा हा भारतात पहिला रिपोर्ट आहे. पाचपैकी एका रूग्णाचा मृत्यू (Death) झाला आहे. हा कोरोनाचा नवीन साईड इफेक्ट (Corona new Corona side effects) समोर आला आहे. first report of rectal bleeding due to cmv virus in covid 19 patient

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. अनिल अरोड़ा(Dr. Anil Arora), चेयरमन, इन्स्टीट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड पॅन्क्रियाटिकोबिलरी सायसन्सेस (Institute of Liver Gastroenterology and Pancreaticobiliary Sciences,) यांच्यानुसार, मागील 45 दिवसांमध्ये कोरोनाच्या पाच रूग्णांमध्ये हा नवीन साईड इफेक्ट (Corona new side effect) आढळून आला आहे.

हे सर्व रूग्ण कोविड-19 च्या उपचाराच्या 20 ते 30 दिवसानंतर पोटात वेदना आणि शौचावाटे रक्त येण्याच्या समस्येनंतर सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये आले, जो कोविडचा संकेत नाही. त्यांच्यापैकी कुणाकडेही या वायरल संसर्गासाठी जबाबदार इतर प्रतिकार स्थिती नव्हती जसे की ट्रान्सप्लांट, कॅन्सर, एड्स इत्यादी रूग्णांमध्ये इम्यूनिटी कमी असल्याने असते.

गंगाराम हॉस्पिटलनुसार 30-70 वर्ष वयोगटातील पाच रूग्णांच्या केस दिल्ली एनसीआर मधून होत्या. पाच रूग्णांपैकी चार शौचावाटे रक्त जाण्याच्या समस्येमुळे तर एक रुग्ण आतड्यात अडथळा आल्याने सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.

त्यापैकी दोघांचे जास्त रक्त वाहत होते, एका रुग्णाला डावीकडे कोलनच्या इमर्जन्सी सर्जरीची आवश्यकता होती. त्यापैकी एका रूग्णाचा कोविडशी संबंधीत इतर समस्यांनी मृत्यू झाला. तर एकास सर्जरीची आवश्यकता भासली. तर उर्वरित तीन रुग्णांवर अँटी व्हायरल औषधाने उपचार सुरूआहेत.

डॉक्टरांनुसार, कोविड संसर्ग आणि त्याच्या उपचारात वापरली जाणारे औषधे विशेषता स्टेरॉईड रूग्णांची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी दाबते आणि त्यांना असामान्य संसर्गासाठी अतिसंवेदनशील बनवते. असाच एक संसर्ग सायटोमेगालो व्हायरस आहे.

सायटोमेगालो व्हायरस 80 ते 90 टक्के भारतीय लोकसंख्येत कोणतेही नुकसान न करता राहत असतो,
कारण आपली प्रतिकारशक्ती इतकी मजबूत आहे की, त्यास वैद्यकीयदृष्ट्या महत्वहीन बनवते.
सीएमव्ही सामान्यपणे त्या रूग्णांमध्ये दिसतो,
ज्यांची इम्युनिटी कमजोर असते. सर्व रूग्ण ‘लो लिम्फोसाईट काउंट’
(सामान्यपणे 20 ते 40 टक्केच्या तुलनेत 6-10 टक्के) च्या रिपोर्टसह सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये आले,
जो संसर्ग असल्याचा संकेत आहे.
यापूर्वी कोरोनामुळे ब्लॅक फंगस म्हणजे म्यूकर मायकोसिस आणि व्हाईट फंगस कँडिडाच्या केस आल्या आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : first report of rectal bleeding due to cmv virus in covid 19 patient

हे देखील वाचा

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नियमावलीवरून आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का नाही?’

मोठा दिलासा ! पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 50 ऐवजी 10 रुपये फक्त, जाणून घ्या