शिर्डी साईबाबा मंदिराकडून केरळसाठी पाच कोटी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

शिर्डीतील साईबाबा मंदिराने केरळमधील पूरग्रस्तांसाठी पाच कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानच्या विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारची मंजुरी मिळताच लगेचच मुख्यमंत्री निधीत पाच कोटीचा धनादेश जमा केला जाईल असे विश्वस्थ मंडळाकडून सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B07665XYTM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3e3ed2a-a765-11e8-b713-d38408ffef79′]
साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली  विश्वस्थ मंडळाची बैठक झाली. या बैठकीला संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त‍ भाऊसाहेब वाकचौरे, अ‍ॅड. मोहन जयकर, बिपीन कोल्हे‍, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके-पाटील, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे-पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.

यावेळी नैसर्गिक संकटात सापडलेल्या केरळातील पूरग्रस्तांना पाच कोटींची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत माहिती देताना अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले की, केरळमधील आपत्ती अत्यंत भीषण आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य समजून माणुसकीच्या नात्याने ही मदत करण्यात येत आहे. राज्‍याच्‍या विधी व न्‍याय विभागाची मान्‍यता घेतल्यावर मुख्‍यमंत्री दे‍वेंद्र फडणवीस यांच्‍याकडे निधीचा चेक दिला जाईल.