फायद्याची गोष्ट ! इथं FD केल्यास मिळेल सर्वाधिक 9 % व्याज, लवकरच ‘दुप्पट’ होईल तुमची रक्कम !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – फिक्स्ड डिपॉजिटवर व्याज दरात लागोपाठ घसरण होत आहे. परंतु, तरीही काही स्मॉल फारूनान्स बँका 8 ते 9 टक्केपर्यंत व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर 50 आधार अंकांचा अतिरिक्त लाभ मिळत आहे. अशावेळी भारतीय स्टेट बँक (एसबीआय), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँकसारख्या प्रमुख बँकांच्या तुलनते स्मॉल फायनान्स बँकांचे एफडी रेट्स जास्त आकर्षक आहेत. जर तुम्हालासुद्धा कमी व्याजदराच्या या काळात जास्त फायदा कमवायचा असेल तर या एफडीवर विचार करू शकता.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे हे एफडी रेट्स 3 जुलैपासून प्रभावी आहेत. या बँकेत तुम्हाला 7 दिवसांपासून 90 दिवस आणि 45 दिवसांपासून 90 दिवसांपर्यंत एफडीवर अनुक्रमे 4 आणि 4.5 टक्के व्याजदर मिळतो. 181 दिवसांपासून 364 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्क्यांच्या दराने व्याज मिळते. एक वर्षांपासून 699 दिवसांपर्यंत मॅच्युअर होणार्‍या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज मिळेल.

या बँकेत 700 दिवसात मॅच्युर होणार्‍या एफडीवर सर्वात जास्त म्हणजे 8 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय, 701 दिवसांपासून 3,652 दिवसांच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या सर्व कालावधींसाठी एफडीवर 50 आधार अंकांनी म्हणजे 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर 1 मे 2020पासून प्रभावी आहेत. या बँकेत 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के आणि 46 दिवसांपासून 90 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के दराने व्याज मिळत आहेत. अशाचा प्रकारे 91 दिवसांपासून 6 महीने आणि 6 महिने एक दिवसापासून 9 महिन्यापर्यंत अनुक्रमे 5.5 आणि 6.50 टक्के दराने व्याज मिळत आहे. 9 महिने एक दिवसापासून एक वर्ष एक दिवसासाठी हा दर 7 टक्के आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 1 ते 2 वर्षांसाठी 7.25 टक्के आणि 2 वर्षापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.50 टक्के दराने व्याज मिळत आहे. अशाच प्रकारे 3 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमीमध्ये मॅच्युर होणार्‍या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. 5 वर्षात मॅच्युर होणार्‍या एफडीवर ही बँक कमाल 9 टक्के दराने व्याज देत आहे. 5 वर्षांपासून 10 वर्षाच्या दरम्यान मॅच्युर होणार्‍या कालावधीचा एफडी दर 7.25 टक्के आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचे हे नवे व्याजदर 1 जून 2020 पासून प्रभावी आहेत. या बँकेत तुम्ही 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंत एफडी करू शकता. 7 ते 45 दिवसांसाठी एफडीवर 4 टक्के व्याज मिळेल. 45 दिवसांपासून 90 दिवस आणि 91 दिवसांपासून 180 दिवसांच्या एफडीवर तुम्हाला अनुक्रमे 4.25 टक्के आणि 4.5 टक्के दराने व्याज मिळेल.

181 दिवसांपासून 364 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के आणि 365 दिवसांपासून 729 दिवसासाठी एफडीवर 7.50 टक्के दराने व्याज मिळत आहे. या बँकेत सर्वात जास्त व्याज 730 दिवसांपासून 1095 दिवसाच्या एफडीवर मिळत आहे, जे 8 टक्के आहे. तर, 1096 दिवसापासून 1825 पर्यंत 7 टक्के दराने व्याज मिळते. 1096 दिवसापासून 1825 दिवसासाठी हे व्याज 7 टक्के आहे. तर, 1826 दिवसापासून 3650 दिवसाच्या एफडीवर 6.50 टक्केच्या दराने व्याज मिळते.