‘या’ स्मार्टफोनवर Flipkart देतंय बंपर ऑफर आणि सूट ! सगळ्यात भारी डील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टवर मोठ्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट रोजी हा सेल सुरू राहणार आहे. यावेळी अनेक स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये ग्राहक Apple iPhone SE (2020) आणि iPhone XR सवलतीच्या दरात खरेदी करू शकणार आहेत. Realme X50 Pro 5G, iQoo 3, Oppo Reno 2 आणि Oppo Reno 10 x Zoom सारख्या स्मार्टफोनवर प्रीपेड आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.

सगळ्यात खास म्हणजे, ई कॉमर्स पोर्टलद्वारे निवडलेल्या स्मार्टफोनवर 1 हजार रुपयांची अतिरीक्त एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जे लोक विक्रीदरम्यान नवीन स्मार्टफोन घेतील त्यांना विना किंमत ईएमआय पर्यायदेखील दिला जात आहे. सोबतच एक्सचंज सूट देखील दिली जात आहे.

या सेलमध्ये iPhone XR वर 6501 रुपयांची सूट दिली जाणार आहे. आता ग्राहक 64 जीबी 52500 रुपयांचा फोन 45,999 तर 128 जीबी 57800 रुपयांचा फोन 51999 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत.

या फ्लिपकार्ट सेलमध्ये Redmi K 20 हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये 19999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय Oppo Reno 2 F हा फोन ग्राहक 18990 रुपयांऐवजी 17990 रुपयांना खरेदी करू शकतात. याशिवाय Oppo A5 s हा फोन 8990 रुपयांऐवजी 7990 रुपयांना मिळणार आहे. तर ई कॉमर्स पोर्टलद्वारे Realme X50 Pro 5G, iQoo 3, Oppo A12 आणि Vivo Y 50 या स्मार्टफोनवर देखील एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.