इतर देशांच्या तुलनेत भारताचा ‘विकासदर’ उत्तम, अर्थव्यवस्था ‘मजबूत’ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत देशाची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे सांगितले. यांसंबधित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, आपल्या देशाचा विकासदर दुसऱ्या देशापेक्षा चांगला आहे. सध्या अमेरिका आणि जर्मनीचा विकासदर देखील कमी होताना दिसत आहे. सर्व देश सध्या मंदीची समस्येने त्रस्त आहे. सध्याचा जागतिक GDP ३.४ टक्के आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धाचा यावर परिणाम होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही टॅक्स जमा करण्याची प्रक्रिया अधिक सोपी बनवली आहे. त्यात सुधार करण्याची प्रक्रिया कायम सुरुच आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, जेथे कुठे भ्रष्टाचाराचा संशय असेल तेथे तपास करण्यात येईल. ४८ तासात तपास अहवाल अपलोड करण्यात येईल. कंपनी अ‍ॅक्ट अंतर्गत १४००० प्रकरणे परत घेण्यात आली आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषणा केली की, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी कायद्यात सूट देण्यात येईल. सीएसआरचे उल्लंघन आता गुन्हा मानण्यात येणार नाही.

सीएसआर म्हणजे काय –
कंपन्याना आपल्या एकूण उत्पन्नातील काही रक्कम सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च करावी लागेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like