Budget 2021 : जुन्या वाहनांसाठी मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आगामी काळामध्ये देशातील खासगी व व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट होणार आहे. या निर्णयानुसार खासगी वाहनांची 20 वर्षानंतर तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी केली जाणार आहे. सरकारने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये ही तपासणी करण्यात येईल, असे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलीय. मात्र, ही चाचणी ऐच्छिक असेल, असेही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलंय.

सीतारामन यांनी सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केलीय. यामुळे इंधनाची बचत, पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण रोखले जाईल. तसेच इंधनाच्या आयातीवरील खर्चही कमी होईल, असे सीतारामण यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी वाहने भंगारात काढण्याच्या योजनेचे संकेत दिले होते. भारतातील सरकारी विभाग आणि पिएसयुद्वारे खरेदी केलेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहनं आता थेट भंगारात जाणार आहेत. वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला लवकर अधिसूचित केले जाणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून याची अंमलबजावणी होणाराय. रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन भंगार धोरणाला मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले होते.