Food Festival Pune PMC | पुणे महानगरपालिका न्यूज : पंतप्रधान स्वनिधी 2.0 महोत्सव अंतर्गत पुण्यातील 9 ठिकाणी फूड फेस्टिव्हल, जाणून घ्या ठिकाणे आणि वेळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Food Festival Pune PMC | पंतप्रधान स्वनिधी 2.0 महोत्सव आयोजन (PM SVANidhi) करण्याचे राज्य सरकारने Maharashtra State Govt) पुणे महानगरपालिकेला Pune Municipal Corporation (PMC) निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने स्वनिधी महोत्सवाअंतर्गत शहरातील 9 ठिकाणी गुरूवार, शुक्रवार व शनिवार या 3 दिवशी फूड फेस्टिव्हलचे (Food Festival Pune PMC) आयोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांना फूड फेस्टिव्हलमध्ये सवलतीच्या दरात खाद्यपदार्थांचा आस्वात घेता येणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिका आणि पथ विक्रेता समितीने पुढाकार घेतला आहे. सदरील फूड फेस्टिव्हलचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. (Food Festival Pune PMC)

फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलेली ठिकाणे आणि त्यापुढील कंसात वेळ खालील प्रमाणे –

1. विश्रांतवाडी चौक Vishrantwadi chowk (संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत)
2. फोटो झिंको रस्ता पुणे स्टेशन Photo Zinco Road Pune Station (संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत)
3. नटराज खाऊगल्ली, जंगली महाराज रोड Natraj Khau Galli JM Road Pune (संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत)
4. गोयल गंगा सिंहगड रोड Goel Ganga Sinhagad Road (सकाळी 9 ते 11)
5. कात्रज उद्यान (राजीव गांधी उद्यान) Katraj Zoo Pune – (संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत)
6. हडपसर भाजी मंडई Hadapsar Bhaji Mandai (सकाळी 9 ते 11)
7. तुळशीबाग / जोगेश्वरी रस्ता Tulshibaug Jogeshwari Lane (सकाळी 12 ते 1)
8. सारसबाग Sarasbaug Pune (सकाळी 9 ते 11)
9. हिराबाग चौक Hirabaug Chowk Pune (संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत)

Web Title :- Food Festival Pune PMC | Pune Municipal News : Food Festival at 9 Places in Pune under Pradhan Mantri Svanidhi 2.0 Festival, Know Places and Timings

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – तिप्पट पैसे परत केल्यानंतरही दिली जीवे मारण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍याला अटक

Pune Fire News | स्वारगेट बसस्थानकाजवळील हातगाडीवरील सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाने वेळेत आग विझवून टाळला मोठा अनर्थ

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी 2500 कोटींचा लिलाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप