रोमान्सचा मूड वाढविण्यासाठी अवश्य खावेत हे १० सुपरफूड

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. यासाठी व्यायामासह योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. रोमान्स मूड वाढविण्यासाठी आणि लैंगिक सुखाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी काही पदार्थ खूप उपयोगी ठरतात. अशा पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. रोमान्स मूड वाढविणारे दहा फूड कोणते आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

केशर महिलांमधील कामेच्छा वाढवण्यात प्रभावी ठरते. केशर गरम पाण्यामध्ये १५ मिनिट भिजवून ठेवावी. त्यानंतर हे तांदळासोबत खावे. या उपायाने महिलांमधील कामेच्छा वाढते. तिळामध्ये उपस्थित झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषकतत्व आहे. हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात. तर मग उत्तम सेक्स लाइफ आणि कामेच्छा वृद्धीसाठी नियमित तिळाचे सेवन करावे.

स्ट्रॉबेरी प्रेम वाढवण्यासाठी आणि सेक्सी मूड बनवण्यासाठी उत्तम फूड आहे. यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट पुरुषांमधील शुक्राणूंची वृद्धी करतात. तसेच डार्क चॉकलेटसोबत स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कामेच्छा वाढते. अक्रेडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी६, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडेंट असते. अक्रोड हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफलासुद्धा उत्तम बनवते. प्रणयक्रीडेतील सुखासाठी खडीसाखर उत्तम आहे. खडीसाखर आरोग्यासाठी पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी आहे. डाळिंबाचे फळ नियमित खाल्ल्याने तसेच डाळिंबाचा ज्यूस सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स टेस्टास्टेरॉन उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते व मूडही चांगला राहतो. बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक असलेले इतर पोषक तत्व असतात. यामुळे कामेच्छा वाढते.

चवीसाठी रताळे जेवढे चांगले असतात तेवढेच तुमच्या सेक्स लाइफसाठीसुद्धा उत्तम ठरतात. पोटॅशियम, बीटा कॅरोटीन यासारखे तत्व तुम्हाला ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेवून कामेच्छा आणि सेक्स लाइफमध्ये वृद्धी करतात. लसणाच्या सेवनाने सेक्स मूड वाढतो. प्रणयामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी लसूण सेवन करावा. रोज सकाळी लसणाच्या २-३ पाकळ्या चावून खाल्ल्याने फायदा होतो. तसेच टरबूज देखील कामेच्छा वाढवणाऱ्या फायटोन्यूट्रीएन्ट्सने भरलेले असते. तसेच सेक्स लाइफला उत्तम बनवण्यातही सहायक ठरते.