मराठा आरक्षणासाठी सामाजिक संघटनांच्या नेत्यांना सोबत घेणार : जालन्यात राजव्यापी बैठक

जालना : पोलीसनामा

अ‍ॅड. शशीकांत पवार, मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर, राजेश कोंढरे, न्या. पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे पाटील, न्या. तांबे, सर्वोच्च न्यायालयाचे विधीज्ञ अ‍ॅड. दिलीप तौर, विनोद पाटील, मानसिंग पवार यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व सामाजिक नेत्यांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा व धोरण ठरविले जाईल असा एकमुखी निर्णय सकल मराठा समाजाच्या जालन्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जालन्यातील मराठा सेवा संघ कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27970ae9-a909-11e8-bff1-fd6ad193d39d’]

या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून लवकरच जालना शहरात मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठांची जिल्हा समन्वयक समिती अशा तीन स्तरावर समित्यांचे गठन करण्यात आले. या समित्यांमार्फत येत्या काळात लढे दिले जाणार आहेत.

राज्य सरकारने केलेल्या घोषणांची व अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी साखळी पध्दतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन केले जाईल. यासोबतच सार्थी, विद्यार्थी, वस्तीगृह, शैक्षणिक शुल्क माफी यासह अन्य मागण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच टप्याटप्यात सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. पश्चिम महाराष्ट्राच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्यात आला असून त्यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील हजारो दुचाकी वाहने मुंबईत धडकणार आहेत. तसेच मराठा आरक्षणाबाबत औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.

मराठा आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांवर मोफत उपचार करणारे डॉक्टर आणि आंदोलकांच्या केसेस मोफत चालविणाऱ्या समाजातील वकीलांचे आभार या बैठकीत मानण्यात आले.