पुणेकरांची बात औरच …आलिशान गाडी घेतल्याचे शाही सेलिब्रेशन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

‘पुणे तिथे काय उणे ‘ ही म्हण पुण्याला आणि पुणेकरांना चपखल लागू पडते. यापूर्वी गोल्डनमन आणि गोल्डन शर्ट साठी पुण्यातील व्यक्ती प्रसिद्ध आहेतच पण आता  आता गोल्डन पेढ्यांसाठी देखील पुणे नव्याने प्रसिद्ध होत आहे. पुण्यातील धायरी येथील एका शेतकऱ्याने आलिशान  जग्वार एक्सएफ गाडी खरेदी केली आणि त्याचा आनंद देखील तशाच आलिशान पद्धतीने साजरा केला. या शेतकऱ्याने चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले.

जाहीरात 
सुरेश पोकळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते धायरी येथे राहणारे असून त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपली वेळगी ओळख निर्माण करत परिसरात नावलौकिक मिळवला आहे.  आलिशान गाडी घ्यावी असे त्यांचे स्वप्न होते. गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा आनंदही शाही पद्धतीनं साजरा करायचा होता. त्यामुळेच त्यांना लोकांना सोन्याचे पेढे वाटून त्यांचं तोंड गोड करायचं होतं.
[amazon_link asins=’B00PL9TGAA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5105dfc3-b1b0-11e8-ab79-355f4e7a4b4d’]

सोन्याचा वर्ख असलेले पेठे तयार करण्याविषयी सुरेश पोकळे यांनी काका हलवाई मिठाईवाल्यांकडे विचारणा केली. काका हलवाई यांनीही पोकळे यांच्यासाठी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले. ७ हजार रुपये किलो दरानं काका हलवाईनं पोकळे कुटुंबियांना हे खास पेढे बनवून दिले. दरम्यान ,पोकळे कुटुंबियांनी नेमके किती पेढे वाटले याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या सोन्याच्या पेढ्यांची पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

पुण्यात आज काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आगमन, ८ तारखेला सभा