गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी धावला अंतराळउद्योजक एलन मस्क

बँकॉक : पोलीसनामा ऑनलाईन

काही दिवसांपासून थायलंडच्या गुहेमध्ये ११ ते १६ वयोगटातील फुटबॉलपटू अडकले आहेत. या अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने ‘प्रोटोटाइप पाणबुड्या’ ची मदत दिली आहे. या गुहेत अजूनही 5 मुले अडकलेली आहेत. ‘मी आताच तीन नंबरच्या गुहेतून बाहेर आलो आहे’ असे ट्वीट एलन मस्कने केले आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b34c4f14-842c-11e8-8a6f-79f3a11bcd88′]
रॉकेटच्या सुट्या भागांपासून मिनीसब तयार करण्यात आले आहे. जर गरज पडली तर मिनीसबचा उपयोग होऊ शकतो. इन्स्टाग्रामवरती एलनने पाण्याने भरलेल्या या गुहेतील व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.अजूनही आत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. त्यांच्या मदतीसाठी एलनने मिनिसब देऊ केली आहे.” एकावेळेस मिनिसब दोन पाणबुड्या आणि व्यक्तींना घेऊन जाऊ शकेल आणि अत्यंत चिंचोळ्या जागेतून ती प्रवास करु शकेल” असं एलनने स्पष्ट केलं आहे. ”आत बसलेल्या व्यक्तीला पोहणं आलंच पाहिजे असं नाही तसेच ऑक्सिजन कुप्यांचा वापर कसा करायचा हे माहिती नसलं तरी चालतं” असं एलनने या मिनिसबची माहिती देताना सांगितले.

नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १०० ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.सध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत, सुटकेनंतर त्यांना फुटबॉलचा अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे.