कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला तीन वर्षे सक्तमजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकऱणी कुंटणखाना चालक महिलेला न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लक्ष्मी भीमसिंग तमांग (वय ४९, रा. वेलकम टु बिल्डींग, बुधवार पेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

बुधवार पेठेतील कुंटणखान्यात मुलींकडून वेश्या व्यवसाय केला जात आहे. असा तक्रार अर्ज फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेचे सत्यजित देसाई पोलिसांकडे दिला होता. त्यावेळी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी तेथे छापा टाकून तिला ताब्यात घेतले होते. तेथील पाच ते सहा मुलींकड़े चौकशी केल्यावर ती त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच लक्ष्मी त्यांच्या ग्राहकांकडून आलेल्या पैशांवर आपली उपजिविका करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला अटक कऱण्यात आली.

देसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लक्ष्मी आणि इतर साक्षीदार घरमालक कस्तुराबाई धुंडप्पा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर या खटल्याचे कामकाज पाहताना अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल त्यांनी ५ साक्षीदार तपासले. तर पंचनाम्यातील महिला पंचाची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाकडून करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने लक्ष्मीला शिक्षा सुनावली.

Loading...
You might also like