‘महामारी’ दरम्यान परदेशी कंपन्यांनी मोठया प्रमणावर ‘इन्वेस्ट’ केला भारतात पैसा, 22 अब्ज डॉलरची आली विदेशातून ‘गुंतवणूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोविड-१९ च्या आऊटब्रेकमुळे अर्थव्यवस्थेत मंदी असतानाही भारत परकीय गुंतवणूकीला (एफडीआय) आकर्षित करण्यात भारत यशस्वी झाला आहे, असे शनिवारी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले. महामारीच्या काळात भारतात २२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली आहे. अमिताभ कांत यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या India@75 वर झालेल्या व्हर्चुअल कार्यक्रमात हे सांगितले. या दरम्यान त्यांनी भारताच्या एफडीआय प्रणालीचेही कौतुक केले आणि सांगितले की, ही संपूर्ण जगातील सर्वात उदारमतवादी एफडीआय प्रणाली आहे.

कांत म्हणाले, ‘आपली एफडीआय प्रणाली जगभरात सर्वात उदार आहे. आपण सातत्याने मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. महामारी काळातही भारतात २२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. यातील सुमारे ९८ टक्के स्वयंचलित मार्गाने आली आहे.’

पुढील २ वर्षात व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत टॉप ३ चे लक्ष्य

या कार्यक्रमात बोलताना कांत यांनी यावर भर दिला की, भारतात याबाबत किती मोकळेपणा आहे, व्यवसायात (Ease of Doing Business) सुलभता आहे. ते म्हणाले, ‘जागतिक व्यापार सुलभता क्रमवारीत भारताने जवळपास ७९ स्थानावर झेप घेतली आहे. आमची आशा आहे की, यावर्षी आपण पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ आणि पुढच्या वर्षी आपण पहिल्या ३ मध्ये असू.’

जिओ प्लॅटफॉर्म्सवरून आली मोठी परकीय गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) डिजिटल युनिट जिओ प्लॅटफॉर्मने एप्रिलपासून सुमारे दीड लाख कोटी रुपये जमा केले आहेत. जिओ प्लॅटफॉर्मने अनेक जागतिक कंपन्यांकडे ३२.९४ टक्के हिस्सा विकला आहे. सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ९.९९ टक्के भागभांडवलासाठी ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. याशिवाय सर्च इंजिन कंपनी गुगलनेही ७.७ टक्के भागभांडवलासाठी ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

टॉप १० एफडीआय मिळवणाऱ्या देशात भारत

संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदे (UNCTAD) नुसार, भारतीय अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील सर्वात लवचिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकते आणि २०२० मध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात तो यशस्वी होईल. मात्र या कालावधीत जागतिक परदेशी गुंतवणूक कमी होईल. २०१९ मध्ये एफडीआय मिळवणार्‍या टॉप १० कंपन्यांमध्ये भारत ९ व्या स्थानावर होता. २०१८ मध्ये भारताची रँकिंग १२ व्या स्थानावर होती.

जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीचे आमंत्रण दिले आणि जागतिक कंपन्यांना आश्वासन दिले की, भारत सरकार मोठ्या प्रमाणात स्ट्रक्चरल सुधारणांसाठी सक्षम आहे.

चिनी कंपन्यांची गुंतवणूक टाळली

एकीकडे भारतात परकीय गुंतवणूक सातत्याने वाढत आहे, परंतु या दरम्यान चीनकडून येणारी परकीय गुंतवणूक सध्या एका स्कॅनरमध्ये आहे. एप्रिलमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, ज्या देशांच्या सीमारेषा भारताच्या सीमेलगत आहेत, अशा कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. अशा सुमारे २०० चिनी कंपन्या आहेत, ज्या अद्याप गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.