’रोते रोते हसना सीखो…’ नायजेरियन युवकाने गायले महानायकाचे गाणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते अमिताभ बच्चन यांचे देशासह परदेशातही चाहते आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचेही लाखो चाहते आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत अमिताभ बच्चन यांचे ’रोते रोते हसना सिखो…’ हे प्रसिद्ध गाणे या व्हिडीओतील तरुण गाताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमी रंजक व्हिडीओ शेअर करणारे इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये हा तरुण फक्त गाणे गात नसून, त्यावर थिरकत देखील आहे. हे गाणे म्हणताना त्याच्या चेहर्‍यावरील आनंद स्पष्ट झळकत आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत स्पष्टता नसली तरी, कमेंट बॉक्समध्ये एका युजरने या व्हिडीओची यूट्यूब लिंक शेअर करत अशी माहिती दिली आहे की हा व्हिडीओ नायजेरिया मधील आहे. ’अंधा कानून’ या चित्रपटातील हे गाणे असून ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झाले आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर एका युजरने अशी कमेंट देखील केली आहे की, आताच्या काही गायकांपेक्षाही या तरुणाचा आवाज चांगला आहे. तर काहींनी त्यांच्या आनंदी असण्याचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला 7.5 हजारापेक्षा जास्त views मिळाले असून, जवळपास 800 लोकांनी यावर कमेंट केली आहे.