भारताचे माजी अ‍ॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे 91 व्या वर्षी कोरोनामुळे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताचे माजी अ‍ॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी (वय,९१) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. मागील काही दिवसापूर्वी सोराबजी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना कोरोनावर मात करण्यास अपयश आले. सोराबजी यांनी १९८९-९० रोजी तसेच १९९८ ते २००४ या कालावधीत दोनवेळा अ‍ॅटॉर्नी जनरल पद भूषवलं होतं.

सोली सोराबजी यांचा जन्म मुबंईत झाला. त्यांचा परतचा कार्यकाळ म्हणजे १९५३ मध्ये सोराबजी हे मुंबई हाय कोर्टात वकील होते. १९७१ साली ते सुप्रीम कोर्टाचे वरीष्ठ वकील झाले. पुढे सोराबजी हे मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर १९९७ साली युएनने त्यांची नायजेरियामध्ये नेमणूक केली होती. १९९८ ते २००४ च्या दरम्यान सोराबजी हे मानवाधिकार प्रोत्साहन आणि संरक्षण या विषयावर UN -सब कमिशनचे सदस्य आणि पूढे अध्यक्ष पद मिळवले. तसेच ते लवाद सदस्य सुद्धा होते.