Former BMC chief K Nalinakshan | दुर्दैवी ! मुंबई मनपाचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा आगीत होरपळून मृत्यू; पूजेच्यावेळी आरती करताना कापुराचा दिवा लागून लुंगीने घेतला होता पेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Former BMC chief K Nalinakshan | मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि सनदी अधिकारी के. नलिनाक्षन (Former BMC chief K Nalinakshan) हे  बुधवारी घरी पूजा करत होते. त्यावेळी आरती करत असताना कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

१९६७ च्या तुकडीतील के. नलिनाक्षन (K Nalinakshan) हे आयएएस अधिकारी (IAS officer) होते. ते मूळचे  कोझिकोडे (Kozhikode ) येथील असून त्यांनी  १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबई पालिका आयुक्त (Municipal Corporation of Greater Mumbai) म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर वाहतूक आणि सीमा शुल्क विभागा (Customs Department) चे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. चर्चगेट येथील निवासस्थानी ते राहात होते.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे नलिनाक्षन पूजा करत असताना आरतीच्या वेळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. त्यावेळी घरी पत्नी आणि नोकर होते. हि घटना घडली यावेळी सर्वानी त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला परंतु देवघराला आतून कडी लावली होती. शिवाय कमरेला पट्टा असल्याने जळती लुंगी बाजूला सारता आली नाही. सर्वांनी अथक प्रयत्नांनंतर त्या खोलात प्रवेश करत त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत ते ८० टक्के भाजले होते. पहिल्या दिवशी उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या नलिनाक्षन यांची प्रकृती नंतर बिघडतच गेली अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : former commissioner mumbai municipal corporation k nalinakshan no more


हे देखील वाचा

Gadchiroli Crime News | राजकीय अडथळा दूर करण्यासाठी ‘सुपारी’ देऊन केली ‘हत्या’ ! नगरसेवक प्रशांत खोब्रागडेला अटक, 5 लाखांची दिली होती सुपारी

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह 2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान