अभिमानास्पद ! भारतीय क्रिकेटमधील ‘हे’ २ माजी खेळाडू अमिरेकेला देणार प्रशिक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषक २०१९ च्या रेसमधून भारतीय संघ उपांत्य फेरीत बाहेर पडला. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे चाहते नाराज झाले. मात्र भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय संघातील माजी खेळाडूंची निवड झाली आहे. अमेरिका क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पुबुदु दसानायके यांनी अनपेक्षित राजीनामा दिला. त्यामुळे अमेरिका क्रिकेट समीतीने संघाच्या प्रशिक्षक पदी भारताचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांची निवड केली आहे.

मागील काही दिवसांपासून अमेरिका क्रिकेट आणि दसानायके यांच्यात वाद सुरु होतो. त्यावरूनच दसानायके यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या जागेवर किरण मोरे आणि त्यांना सहाय्य म्हणून माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

प्रवीण आमरे हे भारतीय क्रिकेटमधील अंडर १९ संघाचे कोच होते. तर सुनील जोशी यांनी बांग्लादेश संघाच्या फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण दिले आहे. अमेरिका संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय खेळाडूंची नाव असणे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मोरे यांनी मागील आठवड्यापासूनच बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील जोशी यांच्याकडे संघाची पूर्णवेळ जबाबदारी दिली जाणार आहे, तर मोरे हे सध्या अंतरिम प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर गेला म्हणून भारतीय चाहते नाराज झाले असतील. पण ही बातमी वाचून नक्कीच सुखावतील.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या