किल्ले रायगडदर्शन महागले, प्रवेशशुल्कात १० रुपयांनी वाढ

महाड : पोलीसनामा ऑनलाईन

रायगड जिल्ह्यातील महाड येथील किल्ले रायगड पाहण्यासाठी वर्षभरात लाखो शिवप्रेमी येत असतात. या शिवप्रेमींकडून १५ रुपये शुल्क आकारले जात होते. आता या शुल्कात पुरातत्व विभागाने १० रुपयांची वाढ केली असून शिवप्रेमींना आता प्रवेशासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. पुरातत्व विभागाने वाढविलेल्या या शुल्क दरवाढी बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

[amazon_link asins=’8184820755,8177666401′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59635c5a-ab4f-11e8-9f3a-cded1e895f4d’]

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. देशासह परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात रायगड किल्ला पाहण्यासाठी येत असतात.

किल्ले रायगडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून पुरातत्व विभाग हे १५ रुपये प्रवेश शुल्क आकारत होते. मात्र, या शुल्कात १० रुपयांनी वाढ करण्यात आली असून रोपवे व पायी चालत येणाऱ्या शिवप्रेमींना आता प्रत्येकी २५ रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. या वाढलेल्या शुल्क दरवाढीमुळे शिवप्रेमीमध्ये नाराजी पसरली आहे. पुरातत्व विभागाने ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी शिवप्रेमीकडून होत आहे.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांकडून १ सप्टेंबर १९९६ पासून प्रवेश शुल्क घेण्यास सुरवात केली होती. त्यासाठी जागतिक वारसा वास्तू आणि आदर्श स्मारक अशी वर्गवारी करण्यात आली.

हृतिक रोशनसह आठ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल