‘गायब’ होण्यापुर्वी CCD चे संस्थापक सिध्दार्थ यांनी लिहीलं कर्मचार्‍यांना ‘भावनिक’ पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सीसीडी’ म्हणजे ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. जी सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या आर्थिक संघर्षाविषयी सांगितले आहे. तसंच त्यांनी आपल्या व्यवसायातील दबावाविषयी सांगितले आहे.

सिद्धार्थ यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्यावरील आर्थिक संकटाची आणि समस्यांबाबत तसंच अपयशाबाबत सांगितले आहे. ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता त्यांचा अपेक्षाभंग केल्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. मी दीर्घकाळ लढलो, मात्र आज मी हार पत्करली आहे. माझ्या एका इक्विटी पार्टनर्सचा दबाव मी आणखी सहन करू शकणार नाही. हा पार्टनर मला सतत शेअर बायबॅक करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसंच हे ट्रान्झॅक्शन एका मित्रासोबत भांडवल उभारण्याच्या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वी केले होते, असं त्यांनी यात स्पष्ट केले आहे.

तसंच इतरही ऋणदात्यांच्या मोठ्या दबावामुळे शेवटी मला हार पत्करावी लागत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मी माझ्या चांगल्या प्रयत्नांनंतरही नफा देणारा व्यवसाय मॉडेल तयार करू शकलो नाही. तसंच ऋण दात्यांचा आर्थिक दबाव आल्याने त्यांनी कर्ज घेतल्याचे या पत्रात नमूद केले आहे. त्यासोबत त्यांनी कोणालाही फसवण्याचा विचार कधीच केला नाही, असंही त्यांनी यात नमूद केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –