वेळेवर केलं नाही ‘Credit Card Bill’ चं पेमेंट तर सहन करावे लागतील ‘हे’ 4 तोटे, कोणते ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   डिजिटल पेमेंटच्या युगात क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर सामान्य झाला आहे. रोकड किंवा खात्यात पैसे नसले तरी क्रेडिट कार्डने पेमेंट केले जाऊ शकते. परंतु जर आपण क्रेडिट कार्डचा नेहमीच वापर करत असाल आणि त्याचे बिल वेळेवर न भरल्यास ते आपल्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. आपण वेळेवर क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill) न भरल्यास आपल्यास कोणते नुकसान सोसावे लागेल त्याबाबत जाणून घेऊया…

क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो

आपण वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येईल. क्रेडिट स्कोअर पुन्हा तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. क्रेडिट स्कोअर प्रभावित झाल्याने त्याचा परिणाम लोन घेण्यावर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा.

लेट फी भरावी लागेल

जर आपण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला लेट फी देखील भरावी लागेल. पुढील बिलिंग तपशीलात लेट पेमेंटची रक्कम जोडून येत असते. लेट फी बँकेनुसार वेगवेगळी असते.

लोन मिळण्यात समस्या

जर क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नसेल तर तुमचे क्रेडिट प्रोफाइल कमी होते. याचा फटका तुम्हाला सहन करावा लागतो कारण जेव्हा कधी तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी जाल तेव्हा ते तुमच्या खराब क्रेडिट प्रोफाइल/ स्कोअरच्या आधारे लोन देण्यास नकार देऊ शकतात.

द्यावे लागेल व्याज

जर क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर आपण रिवॉर्ड पॉईंटचा फायदा घेण्यास सक्षम राहणार नाहीत. एका ठराविक मुदतीत पैसे न भरल्यास व्याज देखील वाढते. या कारणामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडून केवळ लेट फी आकारली जात नाही तर त्यांच्या व्याजात देखील वाढ होते.