कात्रज प्राणी संग्रहालयात रंगला बछड्यांचा नामकरण सोहळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चार महिन्यापूर्वी पुण्यातिल राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला चार गोंडस बछडी झाली. या बछड्यांचे आज नामकरण करण्यात आले. वाघ बागिराम आणि आणि रिद्धी यांच्या चार बछड्यांचे आज नामकरण करण्यात आले. गुरु, आकाश, पूर्णिमा आणि सार्थक अशी या बछड्यांना नाव देण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. थोड्याच दिवसात नागरिकांना पाहण्यासाठी हे बछडे उपलब्ध होणार आहेत.

मागील अडीच महिन्यापासून आईच्या अवतीभवती छोट्याशा पिंजऱ्यात गिरक्‍या मारून ही पिले कंटाळून गेले होती. या पिल्लांना नाव ठेवण्याचा निमित्ताने का होईना, आज मोकळ्या वातावरणात वावरण्याची संधी मिळाली. या चारही बछड्यांनी पिंजऱ्यात मनसोक्त उड्या मारल्या. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत त्यांचे नामकरण करण्यात आले.

चारही बछडी तंदुरुस्त

चार महिन्यापूर्वी बागीराम आणि रिद्धी यांना ४ गोंडस पिल्ले झाली होती. त्यात ३ नर तर १ मादी जातीचा पिल्लू आहे. या चारही बछड्यांची चांगली देखभाल झाल्याने व त्यांना चांगले वातावरण लागल्याने तिघेही सुदृढ बनले आहेत. ४ महिन्यांचे होईपर्यंत या वाघांच्या बछड्यांची खूप काळजी घेतली जाते. त्यांना मानवी स्पर्शापासून शक्यतो दूर ठेवले जाते. ४ महिन्यांचे झाल्यानंतर या बछड्यांना मोठ्या पिंजऱ्यातील मोकळ्या वातावरणात सोडण्यात येते.