बनावट मद्य तयार करणारे ४ जण ताब्यात ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणी काळभोर येथील अवैध वाहतूक व बनावट मद्य उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आहे. कारवाईत सुरज गडदे, विनोद खंडागळे, शिवाजी भंडारी, अमोल कोळपे या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल ४,३४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विभागाने प्रसिध्दी पत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नाताळ व नववर्षाच्या काळात बनावट मद्य उत्पादन करण्याच्या कारवाईत वाढ होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांना मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील शिवाजी यंकय्या भंडारी बाजारमळा दुंडेवस्ती येथे बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सकाळी पाच वाजता हे पथक त्या ठिकाणी पोहोचले. संपुर्ण घराची तपासणी केली असता १७५ लि.विदेशी मद्य स्पिरीट तसेच लेबल बुच (रॉयल स्टॅग,मॅकडोवल व्हिस्की इंपिरियल ब्लू माल्ट सिलिंग मशिन) इत्यादी साहित्य हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक सतिश काळभोर, आनंद काजळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अशोक चव्हाण ,महिला जवान जान्हवी शेडगे ,सोहेल मालुसरे, यांनी केली. अरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.