Free Ration | आता रेशन कार्ड नसतानाही मोफत मिळेल रेशन, जाणून घ्या महाराष्ट्रात लागू आहे ही सुविधा की नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Free Ration | मोदी सरकार (Modi Government) च्या निर्देशानंतर देशातील अनेक राज्यात मोफत रेशन (Free Ration) वाटपाचे काम जोरात सुरू असल्याचा दावा सरकारने केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी ‘वन नेशन वन रेशन कार्ड योजना’ (One Nation One Ration Card Scheme) लागू झाल्यानंतर इतर राज्यांच्या लोकांना सुद्धा मोफत रेशन मिळण्यास सुरूवात झाली आहे, असा दावा मोदी सरकारने केला आहे.

मोदी सरकारच्या दाव्यानुसार, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंडमध्ये अगोदरपासूनच रेशन कार्ड नसतानाही मोफत रेशन दिले जात आहे.
आता इतर राज्यांनी सुद्धा विना-पीडीएस श्रेणीत रेशन वाटप योजना बनवली आहे.
दिल्ली सरकारने आता दुकानांची संख्या वाढवली आहे.

रेशन कार्डमध्ये नाव नोंदण्याचे-काढण्याचे काम

रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदणे आणि नाव काढण्याचे कामही सुरू आहे. रेशन कार्ड आधार किंवा बँक खात्यासोबत लिंक नसेल तरी सुद्धा दिवस रेशन कार्ड निलंबित राहात आहे.
31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करावे.

तर रेशनकार्ड ब्लॉक केले जाईल

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हे काम अजूनही सुरू आहे.
अनेक राज्यांनी याबाबत सूचना जारी केली आहे.
जर आधारसोबत रेशनकार्ड लिंक झाले नाही तर रेशनकार्ड ब्लॉक केले जाईल.

 

ऑनलाइन सुद्धा करू शकता आधारसोबत लिंक

देशातील अनेक राज्यांच्या पूरवठा कार्यालयात किंवा ऑनलाइन तुम्ही आधारसोबत रेशन कार्ड लिंक करू शकता.
केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन कार्डवर नोंदलेल्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा आधार नंबर आता अनिवार्य केला आहे.
31 ऑगस्ट 2021 च्यानंतर तुमचे रेशन कार्ड जर आधारसोबत लिंक नसेल तर ते ब्लॉक केले जाईल.

या नंबरवर कॉल करून घेऊ शकता मदत

या कामात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही टोल फ्री नंबर 18003456194 किंवा 1967 नंबरवर कॉल करून संपूर्ण माहिती मिळवू शकता. या नंबरवर तुम्हाला रेशन कार्डबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
ही सुविधा सध्या 31 ऑगस्टपर्यंतच मिळेल.
जर आधारसोबत रेशनकार्ड लिंक केले नाही तर एक सप्टेंबरपासून रेशन मिळणार नाही.

Web Title : Free Ration | now you will get free ration without ration card non pds category card holders maharashtra

SBI च्या ग्राहकांना गंभीर इशारा ! 30 सप्टेंबरपूर्वी तुम्ही केले नाही ‘हे’ काम तर बंद होईल अकाऊंट, जाणून घ्या

BHR Scam | बीएचआरचा बडा मासा अखेर जाळ्यात ! सुनील झंवरच्या नाशिकमध्ये आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांची कारवाई

Zika Virus | पुण्यातील 79 गावांत झिकाचा प्रादुर्भाव झाल्याची शंका; प्रशासन अलर्ट