Nostradamus Predictions 2021 : दुष्काळ, भूकंप आणि अनेक मोठी संकटं, 2021 सालात काय होणार, वाचा नॉस्ट्रॅडेमस यांची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जग जेव्हा शतकातील सर्वात मोठ्या भयंकर महामारीतून जात आहे, अशावेळी मायकल दी नॉस्ट्रॅडेमस (Michel de Nostredame) चर्चेत आहेत. अनेक जाणकार यास नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणीशी जोडून पहात आहेत. काही दिवसात नवीन वर्षसुद्धा येत आहे.

सर्वांना आशा आहे की, 2021 वर्ष चांगले असावे आणि जगाला कोरोनासह अनेक समस्यांपासून मुक्ती मिळावी. अशावेळी आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवक्ते नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी नव्या वर्षाबाबत काय सांगत आहे.

नॉस्ट्रॅडेमसची 2021 साठी भविष्यवाणी
नॉस्ट्रॅडेमसच्या 2021 सालच्या भविष्यवाणीनुसार एक रशियन शास्त्रज्ञ असे जैविक हत्यार आणि व्हायरस विकसित करेल, जे मनुष्याला झोम्बी बनवू शकते. हे मनुष्यासाठी खुपच घातक सिद्ध होईल आणि आपल्या प्रजातीचा सर्वनाश होण्याच्या शक्यता वाढतील.

इतकेच नव्हे, नॉस्ट्रॅडेमसनुसार दुष्काळ, भूकंप, विविध प्रकारचे आजार आणि महामारी वाढेल. हे जगाच्या अंताच्या अगोदरचे संकेत असतील. जगाच्या अनेक भागात असा दुष्काळ असू शकतो, ज्याचा सामना अगोदर कधीही केलेला नसेल.

एका भविष्यवाणीत असेही म्हटले आहे की, या दरम्यान सूर्याचा विध्वंस पृथ्वीच्या नुकसानीचे कारण बनेल. समुद्रतळ वाढणे आणि पृथ्वी त्यामध्ये सामावण्याची बाब सुद्धा येणार्‍या वर्षांमध्ये सांगण्यात आली आहे.

पृथ्वीवर आदळणार धूमकेतु !
नॉस्ट्रॅडेमसने एका ठिकाणी आपल्या भविष्यवाणीत पृथ्वीवर धूमकेतु आदळण्याबाबत सुद्धा म्हटले आहे, जो भूकंप आणि अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचे कारण बनेल. नासाच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा अगोदरच एक मोठा धूमकेतु पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तवली आहे.

नासा 2009 केएफ1 नावाच्या एका अस्टेरॉईडवर लक्ष ठेवून आहे, जो शास्त्रज्ञांनुसार मे 2022 मध्ये पृथ्वीवर आदळण्याचा धोका आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या अस्टेरॉईडची ताकद 1945 मध्ये हिरोशिमावर अमेरिकेने टाकलेल्या अणू बॉम्बपेक्षा सुमारे 15 पट जास्त असू शकते.

नॉस्ट्रॅडेमसने शतकांपूर्वी ’लेस प्रोफेटीज’ नावाच्या पुस्तकात जगाबाबत अनेक महत्वाच्या भविष्यवाणी केल्या आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1555 मध्ये आली होती. यानंतरच त्यांच्या भविष्यवाणीबाबत जगभरात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पुस्तकात 6000 पेक्षा जास्त भविष्यवाणी आहेत, ज्यापैकी अनेक खर्‍या ठरल्या आहेत.