जया बच्चनपासून तर शर्मिला टागोरपर्यंत बॉलिवूडमधील ‘या’ 5 सासू मां सुनांना लावतात आईप्रमाणं जीव !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमध्ये अशा काही अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्या आपल्या सुनांना मुलीप्रमाणंच जीव लावतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. त्या कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

1) जया बच्चन- जया बच्चन बॉलिवूडमधील दिग्गज अ‍ॅक्ट्रेस आणि नेत्या आहेत. त्यांच सुनेवर म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या रॉयवर खूप प्रेम आहे. त्यांचा राग तर आपण सारेच जाणतो. तरीही त्या सुनेला खूप जीव लावतात. ऐश्वर्या त्यांना मिळाली यासाठी त्या स्वत:ला लकी मानतात. त्या अनकेदा ऐश्वर्याचं कौतुकही करत असतात. ऐश्वर्यालाही सासूचं खूप कौतुक आहे.

2) शर्मिला टागोर- दिग्गज अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांचंही सूनेवर म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरवर खूप प्रेम आहे. लग्नानंतर शर्मिलानं तिच्या लग्नातील लहंगा करीनाला गिफ्ट केला होता. करीनानंही तो रिक्रिएट करून घातला होता.

https://twitter.com/30Kumaar/status/1258381946004135936?s=20

3) अंजू सिंह- रणवीर सिंहची आई आणि दीपिका पादुकोणची सासू अंजू सिंह यांचा एक किस्सा फेमस आहे की, त्या रणवीरचा तो सिनेम नाही बघत ज्यात तो मरतो. परंतु त्यांनी रामलीला आणि बाजीराव मस्तानी पाहिला आहे. कारण यात दीपिकाही आहे. दीपिकानं सांगितलं आहे की, ती आणि अंजू मैत्रीणीप्रमाणे राहतात. दोघी अनेकदा व्हिडीओ चॅट करत असतात.

https://www.instagram.com/p/B-oUrwrB3Vm/

4) प्रिया आहुजा- सोनम कपूरची सासू प्रिया आहुजा हिचंही सोनमवर खूप प्रेम आहे. सोनमनं आपल्या इंस्टा पोस्टमध्ये अनेकदा याचा उल्लेख केला आहे. तिला प्रियाच्या हातचं जेवण खूप आवडतं. दोघींनीही एकमेकींची अनेकदा स्तुती केली आहे.

5) डेनिस जोनस- प्रियंका चोपडाची सासू डेनिस जोनसही प्रियंकाला आईप्रमाणे जीव लावते. तिच्या सासूच्या वाढदिवशी प्रियंकानं खास मेसेज लिहिला होता. यात ती म्हणाली होती की, मम्मी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.