सोमवार पासून गणेश विसर्जन पर्यंत वाहतुकीत बदल

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव सुरु असून गणेशभक्त शहरातील देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. यापुर्वी पुणे शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेची उपाययोजना म्हणून आणि नागरिकांच्या जीवीतास धोका होऊ नये, तसेच वाहतुक सुरळीत चालावी यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीतला बदल समोवार (दि.१७) पासून गणेश विसर्जनापर्यंत असणार असल्याचे पुणे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे.
वाहतुकीतील बदल हे सायंकाळी पाच ते भावीकांची गर्दी संपेपर्यंत असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतूक बदल शिवाजीनगरवरुन स्वारगेट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स.गो. बर्वे चौक – अलका चौक – टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक – कामगार पुतळा चौक – शाहीर अमर शेख चौक – बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यांचा वापर करावा. गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या मार्गावरुन वळवण्यात येणार आहेत. चारचाकी वाहन चालकांनी शिवाजीनगरवरुन स्वारगेटला जाण्यासाठी वरील मार्गाचा वापर करता येईल. चारचाकी वाहनांना गाडगीळ पुतळा ते साहीर अमर चौक व पुढे नेहरुन रोडने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच जिजामाता चौक ते फुटका बुरज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्यापासून नदीपात्रातील रस्त्याने (चंद्रशेखर आपटे रोड) भिडेपूल जंक्शनवरुन अलका चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
 [amazon_link asins=’B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df6e43d9-b98e-11e8-8ab8-c1aab6ccd507′]
लक्ष्मी रोडवरील चारचाकी वाहन चालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.  स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीरोडवरुन हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणाप्रताप रस्त्याने जावे. आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.  पर्यायी मार्ग – बाजीराव रोड, केळकर रस्त्यावरील वाहनांनी आप्पा बळवंत चौक डावीकडे वळून बाजीराव रोडने फुटका बुरुज मार्गे गाडगीळ पुतळा चौक उडवीकडे वळून जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक उडवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणाप्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक डावीकडे वळून शिवाजीरोडने स्वारगेटकडे जावे.
[amazon_link asins=’B07FYHV6DZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7a89619-b98e-11e8-af07-152e235b9c9e’]
नो- पार्कींग  शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्वर चौक उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक उजवीकडे सेवासदन चौक ते आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींसाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी, वाहन चालकांनी बदल करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.