किरकोळ वादातून पती-पत्नीची पाचव्या मजल्यावरुन उडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पत्नीने टेरेसवरुन शेजारच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर उडी घेताच रागाच्या भरात पतीनेही उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवारी) उत्तमनगर येथे घडला. हा प्रकार रात्री नऊच्या सुमारास घडला.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6015927-a7b9-11e8-9ccb-53e3a5926b92′]
मनोज नंदकिशोर वलवे (वय -३६) आणि सोनाली मोनज वलवे (वय-३०) अशी उडी मारलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. यात दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दोघांनी घरातील किरकोळ वादातून हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याने नेमके कोणत्या वादातून हे कृत्य केले हे समजू शकले नाही. मनोज वलवे हा ठेकेदार आहे.