Swiggy आणि Zomato वरून ऑर्डर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! FSSIA ने दिला अन्न सुरक्षेसंदर्भात ‘हा’ आदेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन पद्धतीने जेवणाची ऑर्डर स्वीकारणाऱ्या अनेक कंपन्यांविरोधात तक्रारी येत होत्या. यामुळे अनेकांचा ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागण्यावरून विश्वास उठला होता. मात्र आता ऑनलाइन पद्धतीने मागवलेले पदार्थ चांगल्या पद्धतीने आणि विश्वासाने दिले जाणार आहेत. याबाबत FSSAI (फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया) ने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

FSSAI ने सर्व ऑनलाइन ग्राहकांच्या हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पद्धतीने खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या कंपन्यांना आता खाद्य पदार्थाचे थर्ड पार्टीकडून ऑडिट करणे बंधनकारक केले जाणार आहे.

FSSAI ने दिला हा आदेश –

प्रत्येक प्रकारच्या केटर्सला फूड सेफ्टीची थर्ड पार्टी द्वारे ऑडिटिंग करणे बंधनकारक राहणार आहे. जे आपापल्या खाद्यपदार्थांना बेस्ट पौष्टिक आणि दर्जेदार असा सांगतात त्यांना ऑडिटिंग करून एक रिपोर्ट द्यावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे FSSAI द्वारे टी बॅग धारकांनाही सुनावण्यात आले आहे. ती बॅग धारकांना त्याला टाचणी न लावण्यासाठी सांगण्यात आले आहे. जेवणासाठी लागणाऱ्या सामग्रीचा व्यापार करणाऱ्यांना सुद्धा आता नियमात काम करावे लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –