FYJC Admission 2021 | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर ! प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु, जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परिक्षा (CET Exam) घेण्यात येणार होती. मात्र, आता सीईटी परिक्षा रद्द झाल्यानंतर 11 वी प्रवेशाचे (FYJC Admission 2021) वेळापत्रक (schedule announce) आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11 वीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने (FYJC Admission 2021) करण्यात येणार आहेत. या 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

22 ऑगस्टला पहिली यादी

जाहीर करण्यात आलेले 5 क्षेत्र वगळता उर्वरित राज्यात प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने करण्यात येणार आहे. उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला (admission process) सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान 11 वी प्रवेश अर्जाचा भाग 2 विद्यार्थ्यांना भारायचा आहे. 27 ऑगस्ट रोजी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक आणि अमरावती या 5 मनपा क्षेत्रातील 11 वी प्रवेशाबाबत याआधी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी या वेळापत्रकात बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फारीत मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत तपशील वेळापत्रकात देण्यात आला आहे. देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशाची प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. या पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जारी करण्यात येणार आहे.

संकेतस्थळ-https://11thadmission.org.in

ईमेल- [email protected]

Song Sakhiyan 2 Releases | अक्षय कुमार आणि वाणी कपूरच्या चित्रपटाचे गाणे झाले रिलिज, पहा व्हिडिओ

कसे असेल वेळापत्रक

– 14 ऑगस्ट पासून 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार

– 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी अर्ज भाग 1 भरता येणार

– विद्यार्थ्यांना फॉर्म व्हेरिफाय (Form verify) करण्यासाठी जवळच्या कॉलेज, मार्गदर्शन केंद्रावर जाऊन व्हेरिफाय करावे.

– 17 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत  विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे.

– यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत.

– या दरम्यान विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल.

– 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल.

– अर्जात विद्यार्थ्यांना सुधारणा करायची असेल तर वेळ दिला जाईल.

– 25 ऑगस्टला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल.

– 27 ऑगस्ट सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.

– विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळणार.

– पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळावर जाहीर होणार.

– 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत

– विद्यार्थ्यांना आपल्यला मिळालेले पसंतीचे कॉलेज निश्चित करायचे आहे. अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल.

– 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसरी गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

हे देखील वाचा

Pune Crime | सराफाचे लक्ष विचलित करुन दागिने लंपास करणाऱ्याला फरासखाना पोलिसांकडून तासाभरात अटक

Pimpri News | लिफ्टमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलाचा भिंत फोडून वाचवला जीव; म्हणाला – ‘मला पुनर्जन्मचं मिळाला…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  FYJC Admission 2021 eleventh admission schedule finally announced eleventh admission process starts from today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update