Pimpri News | लिफ्टमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलाचा भिंत फोडून वाचवला जीव; म्हणाला – ‘मला पुनर्जन्मचं मिळाला…’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri News | पिंपरी (Pimpri) येथील साईनगर अपार्टमेंटमधील (Sainagar Apartments) लिफ्टमध्ये अडकलेल्या वृत्त्तपत्र वितरक असलेला अल्पवयीन मुलगा बचावला आहे. त्या मुलाची भिंत फोडून सुखरूप सुटका करण्यात आलीय. सुमित आळसे (Sumit Alase) (वय, 17) असं वृत्त्तपत्र वितरक मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील साईनगर मध्ये (शुक्रवारी) सकाळी सुमित (Sumit ) वर्तमानपत्र वितरण करत होता. 2 इमारतमध्ये वर्तमानपत्र वितरण केल्यानंतर तिसऱ्या इमारतीच्या लिफ्टमध्ये जाऊन तो 7 व्या मजल्यावर गेला. परंतु, लिफ्टमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे 7 व्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. या अचानक लिफ्ट बंद झाल्याने तो घाबरला. मात्र, संयम ठेवत सुमितने अलार्म बटन (Alarm button) दाबले आणि वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे (Newspaper seller Hemant Tambe) यांना काॅल केला. तांबे यांनी तात्काळ सोसायटीचे चेअरमन निलेश गिते (Society Chairman Nilesh Gite) यांना फोन केला. गिते यांनी सुरक्षारक्षक आणि लिफ्टच्या देखभाल करणाऱ्या कंपनीला फोन केला आणि अभियंत्याला बोलवले. त्यानंतर सुमितला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, बाहेर काढता येईना. अखेर ब्रेकरने भिंत (wall) फोडून सुमितला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तात्काळ भिंत फोडून सुमितला बाहेर काढण्यात आले.

बाहेर काढल्यानंतर सुमित आळसे (Sumit Alase) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी तो म्हणाला, ‘मी वर्तमानपत्र टाकण्यासाठी त्या लिफ्टमधे शिरलो. लिफ्ट वर जात असतांना थोडासा धक्का बसला आणि लिफ्ट एकदम वर जाऊन थांबली. लिफ्टची बटणं दाबून पाहिली. मात्र, लिफ्ट जागची हलत नव्हती. धोक्याचा इशारा असणारे बटण दाबले व तांबे सरांनाही फोन करून कळवले. सगळे आले. थोडा धीर आला. लिफ्टच्या बाहेरून सर्वांचे प्रयत्न चालू होते. सर्व प्रयत्न निष्कामी ठरत होते. त्यामुळे माझा धीर खचत चालला होता. एका रहिवाश्याने चहा आणि पाणी एका प्लॅस्टिकच्या पिशवीतून एका फटीतून आत टाकले. बाहेर पडण्याच्या आशा संपत चालल्या होत्या. भिंत फोडून मला बाहेर काढण्यात आले. या सर्वांनी मला पुनर्जन्मचं दिला असं त्यानं सांगितलं.

वर्तमानपत्र विक्रेते हेमंत तांबे (Newspaper seller Hemant Tambe) म्हणाले की,
दररोजच्या प्रमाणे सुमित वर्तमानपत्र टाकण्यासाठी साईनगरी सोसायटीत गेला होता.
त्याचा फोन आल्यानंतर मी तिथे तातडीने पोहचलो. सोसायटीच्या व्यवस्थापनाला कळविले.
सर्व मुलांना संकटाच्या काळात प्रसंगावधनाचे प्रशिक्षण दिले असल्याने सुमित घाबरला नाही.
त्याने समयसुचकता दाखवल्याने वाईट प्रसंग टळला.

साईनगरी सोसायटीचे चेअरमन निलेश गिते (Society Chairman Nilesh Gite) यांनी सांगितलं की,
‘सोसायटीचे सुरक्षारक्षक तसेच विजय सोनवणे, निलेश पऱ्हाड, पंकज खटावकर हे पदाधिकारी आम्ही सर्वजण जसे जमेल तसे प्रयत्न करत होते.
सोसायटीच्या पदाधिका-यांनी लिफ्टच्या मेंटन्सन करणाऱ्या अधिका-यांनाही बोलवले.
आम्ही सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत होते. परंतु, असफल ठरत होतो.
अखेर सर्वमताने भिंत फोडण्याच्या निर्णय घेतला.

Web Title :- pimpri news | boy who dropped newspaper got reborn when he got stuck elevator he broke wall and saved his life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Song Sakhiyan 2 Releases | अक्षय कुमार आणि वाणी कपूरच्या चित्रपटाचे गाणे झाले रिलिज, पहा व्हिडिओ
Chikki Scam Case | चिक्की घोटाळा प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Cyrus Poonawalla | ‘कोव्हिशिल्ड’चा तिसरा बूस्टर डोस आवश्यक, सायरस पुनावाला यांचे मत (व्हिडीओ)