G 20 Summit Pune | जी 20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीनिमित्त 15 जून रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – G 20 Summit Pune | पुण्यातील केंद्रीय विद्यालय गणेशखिंड (Kendriya Vidyalaya Ganeshkhind Pune) येथे 15 जून रोजी, मिश्र शिक्षण प्रणाली अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा (District Level Workshop) तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संबंधित शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाचे आयोजन. (G 20 Summit Pune)

जी 20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीनिमित्त जनभागीदारी कार्यक्रमांतर्गत केंद्रीय विद्यालय गणेशखिंड येथे मिश्र शिक्षण प्रणाली अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाशी संबंधित शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे भारत यावर्षी जी-20 समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेनुसार देशभरात विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जात आहेत. (G 20 Summit Pune)

गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात 15 जून रोजी होणाऱ्या कार्यशाळेत पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालय
आणि नवोदय विद्यालयासोबतच पुण्यातील अनेक सीबीएससी विद्यालयातील (CBSC School) शिक्षक आणि
अनेक शिक्षण तज्ञ सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासंबंधीच्या
विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सोबतच या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी बनवलेल्या विविध
शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या कार्यशाळेत शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी होतील.
गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान ( Principal Shabana Khan) यांनी या
कार्यशाळेबद्दल माहिती देऊन शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Web Title :  G 20 Summit Pune | District Level Workshop on June 15 on the occasion of G20 Education Working Group meeting in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई करते पण ‘या’ प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा